बातम्या
शिरोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By nisha patil - 12/3/2024 12:29:16 PM
Share This News:
शिरोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हापूर : प्रतिनिधी शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील मारुती वैभव यादव (वय २७) याने राहत्या . घरात छताच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. तरुणाने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच नातेवाईकांनी त्यास बेशुद्ध स्थितीत शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. गळफास घेताना जुन्या वापरातील दोरींचा त्याने वापर केला. `मात्र दोरी तुटली. नवीन नायलॉनची दोरी आणून दोरीसमवेत त्याने मोबाईलवर सेल्फी घेऊन आत्महत्या केली. वैभव गावांत पानपट्टीचे दुकान चालवित वडिलांना शेती कामात मदत करत होता. लहान भाऊ वडिलांसमवेत शेतात गेला होता. आई. देवदर्शनासाठी बाहेर गेली होती. घरात कोणी नसल्याचे पाहून त्यानेन जीवनयात्रा संपविली. उमेदीतील मुलाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांना धक्का बसला. त्याच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मनाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिरोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
|