बातम्या
ऐतिहासिक बुरुज वाचवण्यासाठी युवकांचे आमरण उपोषण
By nisha patil - 11/10/2023 7:25:35 PM
Share This News:
शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथे ऐतिहासिक बुरुज वाचवण्यासाठी युवकांनी उपोषण सुरू केले आहे. गावामध्ये आता एकच बुरुज शिल्लक राहिलेला असून याकडेही गावचे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करत असल्यामुळे गावांमध्ये असंतोष वातावरण पाहायला मिळत आहे
शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील ऐतिहासिक बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावामध्ये आता फक्त एकच बुरुज शिल्लक राहिलेला आहे.. शिवगर्जना तरुण मंडळाने वारंवार याकडे लक्ष वेधण्याचा प्रयन्त्न करूनही , याकडे लोकप्रतिनिधींनी मात्र दुर्लक्ष करत आहेत . त्यांच्या या अश्या वागण्यामुळं गावांमध्ये एक असंतोषजनक वातावरण निर्माण झालेला आहे.
सोमवारपासून शिवगर्जना तरुण मंडळाने आमरण उपोषण सुरू केले असून आज त्याचा दुसरा दिवस आहे . लेखी आश्वासनानंतर आम्ही माघारी घेणार असा ठाम निर्णय शिवगर्जना तरुण मंडळाने घेतलेला आहे. या आमरण उपोषण साठी निशांत गोरे, श्रीमंत एक्संबे, कृष्णा कोळी, भरत सलगरे, दत्तात्रय बदामे ,निलेश वनकोरे, सुधीर गोरे, आणि लक्ष्मण चिगरे आधी युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गावातील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन मोजणी करून या विषयावर तोडगा काठूया . असे आश्वासन मिळाले होते. परंतु अद्यापही पूर्ण झालेली नाही. जाणून बुजून या बुरुजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा अशी शिवगर्जना तरुण मंडळाची इच्छा आहे. त्वरित मोजणी करून बुर्जाचे संवर्धन व्हावा अशी समस्त मागणी गावकऱ्याकडून होत आहे.
ऐतिहासिक बुरुज वाचवण्यासाठी युवकांचे आमरण उपोषण
|