बातम्या

बहिरेश्वर येथील युवकाने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या...

Youth from Bahireshwar committed suicide due to debt


By nisha patil - 5/9/2024 8:34:20 PM
Share This News:



बहिरेश्वर प्रतिनिधी... करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर येथील  वारकरी सांप्रदायीक युवक गोरखनाथ वसंत दिंडे वय वर्ष 44 यांने कर्जाला कंटाळून झाडावर गळफास घेवून आत्महत्या केली...
 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गोरखनाथ सकाळी 10 च्या सुमारास तिलकी नावाच्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेला होता. गोरख दुपारचे बारा वाजले तरी कसा परतला नाही हे पाहण्यासाठी त्याचा भाऊ पांडूरंग दिंडे शेताकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला...त्यांनी तात्काळ गाव कामगार पोलीस पाटील दत्ता कुंभार यांना माहिती दिली तद्नंतर पोलीस पाटील यांनी करवीर पोलीस चौकीत वर्दी दिली.त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी सी पी आर रूग्णालयात नेण्यात आले...त्यांच्या पश्चात दोन मूली एक मूलगा आई वडील असा परिवार आहे..गोरखचा  स्वभाव मनमिळाऊ असलेने त्याचा मित्र परिवार मोठा होता.मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी सी पी आर रूग्णालयात गर्दी केली होती..त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे...


बहिरेश्वर येथील युवकाने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या...