बातम्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाने उचलले टोकाचे पाऊल...

Youth took extreme step for Maratha reservation


By nisha patil - 10/19/2023 3:43:07 PM
Share This News:



मराठा आरक्षणासाठी तरुणाने उचलले टोकाचे पाऊल...

जालन्याच्या तरूणाने मुंबईत आयुष्य संपवलं

मराठा आरक्षणासाठी तरुणाने केली आत्महत्या ; विनोद पाटील यांचा दावा

 

 मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.

 मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील  यांनी केला. सुनील कावळे   असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे  रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे .  मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत असून,  खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.
     मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.आत्महत्या करणारी व्यक्ती ही मूळची अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली आहे..


मराठा आरक्षणासाठी तरुणाने उचलले टोकाचे पाऊल...