बातम्या
खुपीरे येथे मतदार जनजागृती आणि नोंदणी मोही्म कार्यक्रम पार पडला
By nisha patil - 4/3/2024 4:34:07 PM
Share This News:
नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व मास्टर स्पोर्ट्स खुपीरे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती आणि नोंदणी मोही्म कार्यक्रम खुपीरे येथे पार पडला.
युवक, नागरिक यांच्या मध्ये निवडणुका, मतदान विषयी असलेली उदासीनता, लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा योग्य वापर कसा करावा, शासनाचा स्वीप कार्यक्रम, मतदान करताना कोणत्या घटकांकडे लक्ष द्यावे अशा विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विक्रम मोहिते, तानाजी काटकर, सर्जेराव कुंभार, नायकू काटकर, शिवाजी काटकर लाभले. श्री प्रदीप कुंभार सर यांनी निवडणूक, मतदान या प्रकिया कडे नागरिकांनी चौकस पणे पाहून आपल अनमोल मतदान योग्य, सुशिक्षित उमेदवाराला कसे द्यावे याविषयीं मार्गदर्शन केले. प्रस्थापित घराणेशाही आणि निवडणुकामध्ये होणारा अनाप खर्च यावर ही प्रकाश पाडला.श्री संदीप कुंभार सर यांनी शासनाचा स्वीप कार्यक्रम तसेच नवीन युवकांनी मतदान ओळखपत्रांसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे याविषयीं माहिती दिली. सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे अमित हुजरे यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी मंडळाचे राहुल मोहिते, दत्ता हुजरे, महेश हुजरे, अर्जुन हराळे, कृष्णात हराळे,प्रदीप मोहिते, संतोष पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
खुपीरे येथे मतदार जनजागृती आणि नोंदणी मोही्म कार्यक्रम पार पडला
|