बातम्या

युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी हुपरी येथे सुरू - जोरदार प्रतिसाद

Yuva Sena Primary Member Registration Starts at Hoopri Strong Response


By nisha patil - 10/10/2024 2:46:53 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील हुपरी येथे करण्यात आली. या अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर युवासेना संपर्क प्रमुख सतीश नरसिंग यांच्या आदेशानुसार आणि युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली या नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संताजी देसाई (युवासेना तालुका समन्वयक), प्रसाद पुजारी (युवासेना हुपरी शहर प्रमुख), संग्राम घाटगे, चेतन कोळी, शाहूराज पाटील, अभिषेक निकम, राज डवरी, राघव घाटगी तसेच कॉलेजचे विद्यार्थी आणि अनेक युवासैनिक उपस्थित होते.

या सदस्य नोंदणीमुळे युवासेना संघटनेला तरुणांचा मोठा आधार मिळत असून, हुपरीमध्ये यासाठी उत्साहवर्धक प्रतिसाद पाहायला मिळत आहे.


युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी हुपरी येथे सुरू - जोरदार प्रतिसाद