बातम्या
कोल्हापुरवर झिकाचे संकट
By nisha patil - 11/29/2023 7:41:15 PM
Share This News:
डासांपासून फौलाव होत असलेल्या झिका वायरसचे संकट कोल्हापूरकरांना भेडसावत असून झिका वायरस मध्ये प्रामुख्याने ताप येणे ,अंगावर पुरळ येणे, डोळे येणे ,सांधे व स्नायू दुखी थकवा आणि डोकेदुखी अशी या आजाराची लक्षणे आहेत. झिका आजारा संदर्भात गरोदर मातांनी डासांपासून संरक्षणासाठी सर्वतोपरे काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे
झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरातील 1494 नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये या तापाचे सहा संशयित रुग्ण आढळले सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत आरोग्य विभागातर्फे 392 घरांचे सर्वेक्षण झाले यावेळी 243 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली महापालिकेच्या वतीने शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे
या सर्वेक्षणा मध्ये महापालिकेच्या वतीने 643 कंटेनर ची तपासणी करण्यात आली यामध्ये नऊ दूषित कंटेनर आढळले ,आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दूषित कंटेनर मधील डासांच्या आळ्या औषध टाकून नष्ट केल्या ,या वायरस फैलावणाऱ्या डासांच्या अळ्या नष्ट करणेसाठी गप्पी माश्यांच्या उपयोग केला जातो टेबलाईवाडी येथे गप्पी मासे पैदास केंद्रातून मोफत गप्पी मासे महापालिकेच्या वतीने दिले जात असून नागरिकांनी तेथून गप्पी मासे घेऊन जावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे
कोल्हापुरवर झिकाचे संकट
|