बातम्या

झिम्मा फुगडी स्पर्धेमुळे नव्या पिढीला परंपरेची ओळख

Zimma Phugadi competition introduces tradition to the new generation


By nisha patil - 10/17/2023 7:13:23 PM
Share This News:



खास विजयादशमी दसऱ्यानिमित्त महिलांच्या कला व सुप्तगुणांना वाव देण्याच्या उद्देशाने पारंपारिक कला व संस्कार जोपासण्यासाठी, कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदार संघातील महिला भगिनींसाठी, कागल तालुक्यातील वंदूर गावच्या सरपंच दिपाली उत्तम कांबळे यांच्या संकल्पनेतून भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 

कागल तालुक्यातील वंदूर गावच्या सरपंच दिपाली उत्तम कांबळे यांच्या संकल्पनेतून भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायेरा हसनसो मुश्रीफ होत्या, यावेळी महिलांना संबोधित करताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या, अशा स्पर्धेच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतातच शिवाय ही पारंपरिक गीतांची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहचण्याचा एक महामार्ग आहे. यामुळे गौरी-गणपती उत्साहातील गीतांची महती कायम राहील.तसेच नव्या पिढीला जुन्या परंपरा ,सण याची ओळख होण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत . 

कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुयशा अंबरिषसिंह घाटगे, कागल पंचायत समितीच्या माजी सभापती राजेश्री माने, ऋतुजा पाटील, माधवी मोरबाळे, संजना तोडकर, शितल नवाळे, सुप्रिया भोसले, रेश्मा शेख, छाया कुंभार, रूपाली गुरव, सुनीता खोडवे, धनश्रीदेवी घाटगे, उपसरपंच दिपाली रणदिवे, सविता हिरेमठ,रेश्मा माळकर, मालुबाई कांबळे यांच्यासह  परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


झिम्मा फुगडी स्पर्धेमुळे नव्या पिढीला परंपरेची ओळख
Total Views: 2