बातम्या

आशा व गटप्रवर्तक यांचे कार्य कौतुकास्पद.. तालुका वैद्यकीय अधिकारी- डॉ फारूक देसाई

admiriable work of asha group


By Administrator - 7/13/2023 4:22:19 PM
Share This News:



आशा व गटप्रवर्तक यांचे कार्य कौतुकास्पद.. 

तालुका वैद्यकीय अधिकारी.. डॉ फारूक देसाई

सिद्धनेर्ली : आरोग्य विभागांमध्ये आशा व गटप्रवर्तक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ फारूक देसाई यांनी केले. ते सिद्धनेर्ली येथे आयोजित केलेल्या, सिटु सलग्न, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या, कागल तालुका मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सिटु चे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे हे होते. 

 

अध्यक्षस्थानावरून बोलताना, कॉ भरमा कांबळे यांनी,महाराष्ट्रासह, देशभरातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत कायम करेपर्यंतचा लढा सिटुचा लढा सुरूच राहील, त्यासाठी सर्वपातळीवर संघर्ष केला जाईल अशी ग्वाही दिली. 

 

यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती पुनम मगदूम यांनी कोरोना काळामध्ये आशा व गटप्रवर्तक यांच्याबाबतीत बहुतांशी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना पुनम मगदूम यांनी, आपण सभापती असताना, ग्रामपंचायत स्थरावर दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान, ग्रामपंचायत स्थरावरील पेंडीग मानधन, याशिवाय जिल्हापरीषदच्या सर्वसाधारण सभेत आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्याबाबत आवाज उठवल्याचे सांगितले. 

             हा मेळावा ऑल इंडियाच्या सदस्य व जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

             या मेळाव्यामध्ये, तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचे उपकेंद्र,प्रा आ केंद्र स्तरावर,येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी, आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच तालुका स्तरावर कमिट्या गटीत करण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तालुक्यातुन उपस्थित असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांनी त्यांचे प्रश्न,अडचणी यावर चर्चा केली.यावेळी सारीका पाटील, पद्मा भारमल, माया काशिद,जयश्री काळुगडे,गिता करडे यांनी चर्चेत भाग घेतला. 

            

यावेळी, मा इंद्रजीत पाटील (तालुका समुह संघटक ), कॉ शिवाजी मगदूम, कॉ उज्वला पाटील, विक्रम खतकर, बाळासाहेब कामते, मोहन गिरी, मनिषा पाटील, मनिषा मोरे, यांनी मार्गदर्शन केले.  

            या मेळाव्याच्या निमित्ताने पुढील तिन वर्षासाठी नऊ पदाधिकारी व १२ सदस्य अशी २१ लोकांची नविन कमिटी एकमताने निवडण्यात करण्यात आली. 

 

यामध्ये तालुका अध्यक्षपदी मनीषा पाटील

जनरल सेक्रेटरीपदी संगीता कामते, कोषाध्यक्षपदी आरती लुगडे, 

उपाध्यक्षपदी सुजाता फराटे, राजश्री खिरुगडे सारिका पाटील सहसचिवपदी सुरेखा लोहार ,माया काशीद ,माधुरी पाटील,सदस्यपदी 

उषाताई नलवडे, सरिता पाटील, पद्मा भारमल वंदना सातवेकर, सविता आडूरे ,शालन कदम, जयश्री काळूगुडे, सविता पाटील, राणी मगदूम, सुवर्णा लोहार, माधुरी अस्वले, गीता करडे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ सारीका पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन आरती लुगडे , आभार सविता पाटीलन यांनी मानले.


आशा व गटप्रवर्तक यांचे कार्य कौतुकास्पद तालुका वैद्यकीय अधिकारी.. डॉ फारूक देसाई