बातम्या

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी प्रवेशास प्रचंड प्रतिसाद -पहिल्या फेरीत ६० टक्के प्रवेश पूर्ण

admissions completed in first round


By nisha patil - 12/7/2023 6:01:09 PM
Share This News:



कोल्हापूर डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या नव्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात ६० टक्के जागांसाठीचे प्रवेश पूर्ण झाले असल्याची माहिती डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.

  मेडिकल क्षेत्रातील सर्वोत्तम शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या  नव्या अभियांत्रिकी संस्थेस अखिल भारतीय तंत्र शिक्षण आयोगाकडून (एआयसीटीई) नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यास अनुसरून प्रथम वर्ष सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.  स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट या संस्थेत वर्ष २०२३- २४ साठी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  या ठिकाणी अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्याच्या करिअरला उत्तम आकार मिळेल असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला.

   नव्या संस्थेत २०२३-२४  या शैक्षणिक वर्षासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग १८० जागा, इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंग,  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनिअरिंग (डाटा सायन्स)च्या प्रत्येकी ६० जागा, एम.बी.ए व एम.सी.ए  प्रत्येकी ६० जागा आणि बी.सी. ए व बी. बी.ए.च्या प्रत्येकी १२० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यातील एम.सी.ए अभ्यासक्रमाच्या सर्व जागा भरल्या आहेत. सर्वच अभ्यासक्रमासाठी उच्च गुणवत्तेचे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. गेल्या ४० वर्षापासून डी. वाय. पाटील ग्रुप गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी ओळखला जातो. नव्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्याना या अनुभव व ज्ञानाचा चांगला फायदा होईल, असे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांनी सांगितले.

    प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत ६० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित जागांसाठी पुढील १० दिवस प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्य सीईटी, जे.ई.ई. किंवा समकक्ष अन्य सीईटी परीक्षा दिलेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. शासन नियमानुसार सर्व शिष्यवृत्ती लागू असून विद्यापीठातर्फे प्रत्येक शाखेतील सर्वोच्च गुणप्राप्त विद्यार्थ्याला सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप अंतर्गत संपूर्ण वर्षाची फी माफ केली जाणार असल्याची माहिती माहिती डॉ. भोसले यांनी दिली.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी प्रवेशास प्रचंड प्रतिसाद -पहिल्या फेरीत ६० टक्के प्रवेश पूर्ण