बातम्या

'हे' आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

amazing benefits of drinking warm water on an empty stomach


By nisha patil - 12/25/2023 7:25:00 AM
Share This News:



'हे' आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात बहुतेक लोक कोमट पाणी पितात काही लोक मात्र प्रत्येत ऋतूत आपल्या दिवसाची सुरूवात गरम पाण्याने करतात  आज आपण रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, याबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्या आरोग्यासाठी पाणी अत्यंत चांगले असते. आपण जेवढे जास्त पाणी पितो, तेवढा जास्त फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो f . अनेकदा डॉक्टर आपल्याला सांगतात की, दररोज ३-४ लिटर पाणी प्यावे. मात्र तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन करत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

, , ,

जाणून घेऊया रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे  -

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम  -

वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासोबतच गरम पाणी चयापचय दर देखील सुधारते. तुम्ही रोज एक ग्लास कोमट पाण्यात मध टाकूनही पिऊ शकता. यामुळे वजन सहज कमी होते.

शरीर डिटॉक्स करते

कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण सहज निघून जाते. यासोबतच कोमट पाणी आतड्यात साचलेली घाण काढून टाकण्यासही मदत करते. लिंबू मिसळून कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील घाण निघण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो

रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.

हंगामी रोगांपासून संरक्षण होते 

गरम पाणी प्यायल्याने मौसमी फ्लू , खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो.
याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती ही  चांगली राहते.
कोमट पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
त्यामुळे दुखणे  आणि सायनस  सारख्या आजारांपासून आराम मिळतो.


'हे' आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे