बातम्या
आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी द्यावा अन्यथा गोदामात घुसू
By Administrator - 10/31/2023 3:53:17 PM
Share This News:
आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी द्यावा अन्यथा गोदामात घुसू.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर याना दिला इशारा
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी १0 नोव्हेंबर पासून आनंदाचा शिधा वाटप करू असे दिले आश्वासन
कोल्हापूर
राज्य सरकारने सर्वसामान्याची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे नेहमीप्रमाणे त्यासाठी लागणारे टेंडर काढायला वेळ घालवला त्यामुळे आनंदाचा शिधा अजून शहर आणि तालुक्यात पोहोचलेला नाही
आनंदाचा शिधा यामध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहेत ,परंतु आजअखेर दोन वस्तू ही उपलब्ध झालेले नाहीत ,एकाच वेळी सर्व वस्तू पिशवीतून वाटप कराव्यात त्यासाठी पिशव्यांची उपलब्धता जिल्ह्यामध्ये नाही या सर्व गोष्टींचा आढावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आला
मागील वर्षी सुद्धा असाच गोंधळ राज्य सरकारने घातला होता, दिवाळी झाली तरी लोकांना आनंदाचा शिधा मिळाला नव्हता, पण यावेळी दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा गोरगरीब सामान्य लोकांना वेळेत मिळाला नाही तर,धान्य गोदामात शिरून आनंदाच्या शिध्याचे वाटप करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे
जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी वरील विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली असता त्यांनी दोन ते तीन दिवसांमध्ये आनंदाचा शिधा असणाऱ्या गाड्या लोड होत आहेत. पाच नोव्हेंबर पर्यंत गोडाऊन मध्ये आनंदाचा शिधा पोहोचेल आणि त्यानंतर तिथून दुकानांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.असे आश्वासन दिले 10 तारखेपासून आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निश्चित झालेले आहे व तसे नियोजन केलेले असल्याचे त्यांनी सांगितले .
दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा सर्वसामान्यांना देण्याचा आम्ही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत अशी खात्री त्यांनी दिली
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर मुख्य संघटक संजय पाटील, राजू दिंडोर्ले ,प्रसाद पाटील ,विजय करजगार ,निलेश धुम्मा ,अजिंक्य शिंदे गणेश शिंदे उपस्थित होते
आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी द्यावा अन्यथा गोदामात घुसू
|