बातम्या

सेकेंड प्री-वेडिंगच्या शेवटच्या दिवशी राधिकाने परिधान केलाय लाखो रुपयांचा

annat ambani


By nisha patil - 11/6/2024 8:05:10 PM
Share This News:



अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं सेकंड प्री-वेडिंग इटलीतील क्रूझवर पार पडलं. इटलीतील 'ला डोल्से वीटा'मध्ये पार पडलेल्या या इव्हेंटमध्ये राधिकाने कमाल लूक कॅरी केला होता. या इव्हेंटसाठी राधिकाने गुलाबी रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत ऐकूण प्रत्येक जण हैराण होईल. या इव्हेंटसाठी राधिकाने 1959 मधील Christian Dior कॉकटेल ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.राधिकाने परिधान केलेला कॉकटेल ड्रेस रास्पबेरी सिल्कचा आहे. आधी या ड्रेसची किंमत 1500 ते 2000 डॉलरच्या आसपास होती. पण विंटेज क्लोदिंग एक्सपर्ट डोरिस रेमंडने 2016 मध्ये या ड्रेसचा लिलाव केला. त्यानंतर या ड्रेसची किंमत आणखी वाढली. या 'डायर हाउते कॉचर' ड्रेसचा लिलाव 3,840 अमेरिकन डॉलरमध्ये करण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार, या ड्रेसची किंमत 3,19,416 रुपये आहे. एकंदरीत राधिका मर्चेंटने आपल्या सेकंड प्री-वेडिंगमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची किंमत 3 लाखांपेक्षा अधिक आहे"याआधी राधिकाचे अनेक लूक्स चर्चेत आलेले आहेत. पण चाहत्यांमध्ये सध्या तिच्या गुलाबी रंगाच्या विंटेज ड्रेसची चर्चा आहे. या फोटोमध्ये अंबानी कुटुंबियांची होणारी सून साधिका मर्चेंट खूपच सुंदर दिसत आहे..


सेकेंड प्री-वेडिंगच्या शेवटच्या दिवशी राधिकाने परिधान केलाय लाखो रुपयांचा