राजकीय

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक सचिवपदी विनय कदम यांची नियुक्ती

appointment of vinay kadam


By Administrator - 11/29/2023 6:14:46 PM
Share This News:



महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक सचिवपदी विनय कदम यांची नियुक्ती

नियुक्ती केलेबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या हस्ते प्रदान 

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीबाबतचे आदेश 

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विनय विश्वनाथ कदम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक सचिवपदी नियुक्ती केली आहे. एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरु करणारे विनय कदम गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून विनय कदम  पक्षात कार्यरत असून पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत  त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ. जितेंद्र आव्हाड व जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

. नियुक्ती केलेबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या हस्ते विनय  कदम यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे, नितीन भाऊ पाटील, गणेश जाधव, महिला शहराध्यक्षा पद्मजा तिवले व महिला अध्यक्षा आश्विनी माने, मुसाभाई कुलकर्णी, महादेव पाटील, राजु मालेकर, गणेश नलवडे, सादिक आत्तार, चंद्रकांत सुर्यवंशी, आदित्य निळकंठ, संदिप साळोखे,जयकुमार शिंदे, श्रीकांत पाटील, पंडित कळके, आनंदा जाधव तसेच अरूणा पाटील, निता पाटील व वर्षा भोसले इ.महिला कार्यकर्त्यांसह मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक सचिवपदी विनय कदम यांची नियुक्ती