बातम्या
आता रेशनसोबत मिळणार साडी, चंद्रकांत पाटलांची घोषणा
By nisha patil - 10/2/2024 8:13:29 PM
Share This News:
दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशन दुकानात आता रेशनसोबत साडी देखील मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. रेशनसोबत मिळणारी साडी ही मालेगावातून मिळणार आहे. येवला येथील शाल, पैठणी, घोंगडी आदी पाच वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. यंत्रमागधारकांना काम मिळावे म्हणून साडी तयार करणार असल्याचे पाटील म्हणाले. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
येवला येथील शाल, पैठणी, घोंगडी आदी पाच वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. नोंदणी कामगारांना 10 हजार रुपये फेस्टिव्हल बोनस देण्यात येणार आहे. कामगारांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर लाईफ टाईम बोनस देणार असल्याची घोषणा देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आज मालेगाव दौऱ्यावर आलो असल्याचे पाटील म्हणाले. वस्त्रोद्योग समितीने केलेला रिपोर्ट तयार असून, वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी मान्य करण्यात आल्याचे पाटील म्हणाले. यंत्रमाग धारकांना काम मिळावे म्हणून साडी तयार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशन दुकानात रेशन सोबत साडी मिळणार असल्याचे पाटील म्हणाले
दरम्यान, राज्यातील गोळीबाराच्या घटनेबाबतही प्रसारमाध्यमांनी पाटील यांना प्रश्न विचारले. यावेळी पाटील म्हणाले की, गोळीबाराच्या अशा प्रकारच्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. राज्याचे गृहखाते यावर लक्ष ठेऊन असल्याचे पाटील म्हणाले. या घटनांची चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. .
एकनाथ शिंदे आणि भाजप महाराष्ट्राला बिहार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोण संजय राऊत ? आम्ही त्यांच्यावर टिप्पणी करत नाहीत. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या प्रश्नाला बगल दिली. राजकीय पक्ष हे भजनी मंडळी नाहीत. निवडणुका सर्वांना लढवायच्या असतात. त्यादृष्टीनं निवडणुकीची तयारी सुरूच असते असे पाटील म्हणाले. महायुतीत 14 घटक पक्ष आहेत, सगळेच आपापल्या परीने तयारी करतात. तीन मोठे पक्ष ठरवतील ज्यांना तिकीट मिळेल त्याचे मागे सर्वजण राहणार. कुणी कुणाला शह देणार नाही असे पाटील म्हणाले.
महायुतीत तीन प्रमुख पक्ष आणि 14 घटक पक्ष आहेत. त्यांचे नेते समर्थ आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघ सर्व्हे पूर्ण झाला असल्याचे पाटील म्हणाले. सर्व्हे मुठीत आहे, मूठ कधी उघडायची ते नेते ठरवतील असेही पाटील म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंबंधी बॅलन्स साधला आहे. त्यांची मागणी मान्य करताना ओबीसीला धक्का लागणार नाही. सगे - सोयरे कुठेही ओबीसींना धक्का लागणार नाही. या महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना ACBC चे मराठा आरक्षण मिळणार आहे. मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची गरज काय..? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
आता रेशनसोबत मिळणार साडी, चंद्रकांत पाटलांची घोषणा
|