बातम्या

शाहू कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान

best sugarcane development and conservation award


By nisha patil - 1/23/2025 5:52:37 PM
Share This News:



शाहू कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान

पुणे (दि. 23) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार व्हीएसआयच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे आणि उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांने हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते-पाटील, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कारखान्याच्या वतीने संचालक युवराज पाटील, यशवंत उर्फ बॉबी माने, सचिन मगदूम, सुनिल मगदूम, संजय नरके, भाऊसाहेब कांबळे, रेखाताई पाटील, सुजाता तोरस्कर आणि कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रतिक्रिया:
राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुरस्कार प्राप्तीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यरत असून, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कारखान्याने राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कारांची परंपरा कायम राखली आहे. आम्ही ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राहू, जे शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील.”


शाहू कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान
Total Views: 43