राजकीय

अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात  शाहू नेहमीच अग्रेसर

boiler deepprajwalan in kagal


By Administrator - 10/16/2023 5:00:17 PM
Share This News:



अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात  "शाहू " नेहमीच अग्रेसर
सहकारी साखर कारखान्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात  "शाहू " नेहमीच अग्रेसर ... 

 राजे समरजितसिंह  घाटगे

 नऊ लाख मे टन गाळपाचे उद्दिष्ट 

४४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन विधीवत संपन्न 

पुरस्कार स्वीकारण्याचा मान कर्मचाऱ्यांनाही 

कागलः
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि भविष्याची गरज ओळखून ,सहकारी साखर उद्योगांमध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापराबाबत कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आग्रही होते. त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय पायवाटेने जाताना "शाहू "ने कारखान्यामध्ये नेहमीच अध्यावत तंत्रज्ञानाचा वापरावर भर दिला आहे. योग्य वेळी व योग्य ठिकाणी अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यामध्ये 
" शाहू" नेहमीच अग्रेसर असून तो पहिला सहकारी साखर कारखाना असावा ..असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी केले.
   कारखान्याच्या ४४व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन अध्यक्षा  श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

  व्यासपीठावर  उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालिका रेखाताई पाटील, सुजाता तोरस्कर यांच्यासह सर्व संचालक यांची उपस्थिती होती.
 
    श्री.घाटगे पुढे म्हणाले, स्व. राजेसाहेब नेहमी सांगायचे कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. नेहमी अद्यावत रहा. त्यांचे शिकवणीप्रमाणे आपला कारखाना तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वांच्या फार पुढे आहे. गेल्या पाच वर्षात तीन वेळा देशातील सर्वोत्कृष्ट  साखर कारखाना हा पुरस्कार मिळाला आहे.यावर्षी अनेक नवीन प्रकल्प सुरु होत आहेत. ते पूर्ण झाल्यावर सेंटरवाईज सभासदांना कारखाना पाहण्याचे नियोजन करू. यंदा ऊस टंचाईच्या परिस्थितीमध्ये शाहूच्या सभासद शेतकऱ्याने उसाची इतर विल्हेवाट करू नये. येणारा गळीत हंगाम  सर्वासमोर एक मोठे आव्हान आहे. केवळ एकशे वीस दिवसापर्यंत हा हंगाम चालेल असे आजचे चित्र आहे. त्यामुळे ऊस तोड वेळेत होऊन ऊस क्षेत्र लवकर रिकामी होणार आहे. ऊस क्षेत्र लवकर रिकामे व्हावे या दृष्टीने
काही सभासद नियमितपणे ऊस पुरवठा करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  चालू वर्षीची  इतरत्र ऊस विल्हेवाट केलेस, प्रशासनास याबाबत वेगळा विचार करावा लागेल.

आपल्या स्वागत व प्रास्ताविकात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मागील गळीत हंगामाचा आढावा घेतला. हंगाम २०२३-२४ बाबत बोलताना ते म्हणाले, या हंगामासाठी व्यवस्थापनाने  नऊ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. संचालक मंडळांने निश्चित केलेली उद्दिष्टपूर्ती सर्व सभासद, शेतकरी ,बंधू भगिनी यांक्या  सहकार्यामुळेच यशस्वी  झालेली आहे. त्यामुळे या गळीत हंगामातसुद्धा ही उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी पिकविलेला व नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी केले.
आभार संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांनी मानले.

 कारखान्याच्या प्रगतीमध्ये नेहमीच कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याची नोंद म्हणून यापुढे कारखान्यास मिळालेले बक्षीस स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही संचालकांच्या बरोबरीने घेऊन जाऊ आणि पुरस्कार स्वीकारण्याचा मान कर्मचाऱ्यांना देऊ.अशी घोषणा घाटगे  यांनी केली.


अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात  शाहू नेहमीच अग्रेसर