शैक्षणिक
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक आणि टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन
By nisha patil - 1/30/2025 10:29:19 AM
Share This News:
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक आणि टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन
कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यूचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कॅम्पस इंटरव्यू मध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
टाटा मोटर्सच्या सीनियर मॅनेजर संजय भोळे, एच. आर. ऑफिसर राजेश रोकडे आणि ऋषिकेश गुंड यांनी या इंटरव्यूचा आयोजन आणि मुलाखती घेतल्या. विविध पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स सारख्या नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. या मुलाखतीत विद्यार्थ्यांना त्यांचं तांत्रिक ज्ञान, अनुभव आणि टीमवर्क या महत्त्वाच्या बाबींबद्दल सल्ला देण्यात आला.
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपनीत काम करण्यासाठी टेक्निकल नॉलेज, अनुभव, टीमवर्क, आणि ह्यूमन रिसोर्स व्यवस्थापन यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
संजय भोळे यांनी टाटा मोटर्सच्या कार्यसंस्कृतीवर भाष्य करताना, टाटा मोटर्सला एक कंपनी म्हणून न पाहता एक "फॅमिली" म्हणून पाहिलं पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर, त्यांनी प्रॅक्टिकल ज्ञान आणि अनुभव महत्वाचे असल्याचे सांगितले, तसेच सर्टिफिकेटच्या जोडीला अनुभव असला तर भविष्यात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात, असं त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे, आणि विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. विविध पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात कॅम्पस इंटरव्यूमध्ये सहभाग घेतला आणि आपल्या भविष्याची दिशा ठरवली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक अत्यंत महत्त्वाची संधी मिळाली आहे आणि त्यांच्या करिअरला एक मोठा टर्निंग पॉईंट मिळण्याची शक्यता आहे.
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक आणि टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन
|