राजकीय

 मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

car destroying


By Administrator - 1/11/2023 9:44:27 AM
Share This News:



 मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड
.मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत, मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.


राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे

छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली , हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना समोर येता कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


 मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड