बातम्या

… या तीन कारणामुुळे होते श्वास घेण्याची समस्या

causes cause breathing problems


By nisha patil - 3/19/2024 7:28:20 AM
Share This News:



श्वास घेण्याची समस्या  जास्त लोकांना समजत नाही. कारण त्यांना या समस्येची लक्षणे आणि कारणे  स्पष्टपणे माहीत नसतात. त्यामुळे अनेकजण सुरूवातीला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत जाते. आज आपण श्वास घेण्यास समस्या होणाऱ्या तीन कारणांबाबत जाणून घेणार आहोत.

सूज आणि इन्फेक्शनमुळे
1) श्वासनलिकेत सूज, इन्फेक्शन किंवा कोणत्याही इतर कारणाने जेव्हा ऑक्सिजन पुऱेशा प्रमाणात शरीरात प्रवेश करत नाही. तेव्हा तुम्हाला छोटे श्वास घ्यावे लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही आधीसारखा मोठा श्वास घेत होते त्यातुलनेत तुमच्या श्वासांचा कालावधी छोटा होऊ लागतो. ही समस्या जर फार जास्त काळापासून सुरू असेल तर अस्थमा, निमोनिया किंवा क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीजचे (सीओपीडी)ची लक्षणे असू शकतात.

 

2) अधिक वजन ः ज्यांच वजन जास्त असते त्यांनाही श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. कारण अशा लोकांना दम लवकर लागतो. दम लागल्याने  ब्रिदींग पॅटर्न डिस्टर्ब होतं आणि फुप्फुसात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होऊ शकत नाही.

 3) तणाव ः जे लोक फार जास्त तणावात राहतात त्यांनाही श्वास घेण्याची समस्या होऊ शकते. ते एकतर फार लवकर लवकर श्वास घेतात किंवा छातीत जडपणा जाणवत असल्या कारणाने त्यांची श्वास घेण्याची गती मंदावते. या दोनही स्थितीत त्याचे श्वास घेण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण येते.
काय काळजी घ्याल
1)  जर तुम्हाला फुप्फुसात इन्फेक्शन किंवा छातीत जडपणा वाटण्याची समस्या असेल तर जराही वेळ न घालवता लगेच डॉक्टराशी  संपर्क साधावा.
2)  तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक काढा आणि चहाचं नियमित सेवन करा. दिवसातून किमान 3 ते 4  वेळा गरम पाण्याचे सेवन करा. या उपायांनी तुम्हाला जरा आराम मिळण्यास मदत होईल.
3)  दिवसा कमीत कमी 2  तास घराची दारे आणि खिडक्या उघड्या करून ठेवा. याने तुमच्या घरातील दूषित हवा बाहेर निघून जाईल.
4) तसेच प्राणायाम, ध्यान आणि योगा करा. वॉकिंग आणि रनिंग करा. याने तुमची फुप्फुसे मजबूत होती. ब्लड सर्कुलेशन योग्य होण्यासही मदत होईल.


… या तीन कारणामुुळे होते श्वास घेण्याची समस्या