बातम्या

अभियांत्रिकीच्या  विद्यार्थ्यांकडून पंचगंगा घाटाची स्वच्छता

cleaning of river by student


By Administrator - 11/28/2023 5:16:44 PM
Share This News:



अभियांत्रिकीच्या  विद्यार्थ्यांकडून पंचगंगा घाटाची स्वच्छता

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने केला उपक्रम 

दिपोत्सवानंतर घाट परिसरातील   माती आणि मेणाच्या पणत्या, निर्माल्य आणि घनकचरा गोळा करून स्वच्छता

कसबा  बावडा 

२७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पंचगंगा घाटावर मोठ्या उत्साहत दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिपोत्सवासाठी कोल्हापुरासाठी हजारो भाविकानी उपस्थित राहून घाटावर दिप लावुन मनोभावे पूजा केली. यावेळी हजारो पणत्यांच्या प्रकाशाने यावेळी पंचगंगा घाट उजळून निघाला.

   दिपोत्सवानंतर माती आणि मेणाच्या पणत्या, निर्माल्य आणि घनकचरा घाट परिसरात निर्माण झाला होता. डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या एन.एस.एस स्वयंसेवकांनी येथील सर्व कचरा गोळा करून स्वच्छता केली. या मोहिमेला कोल्हापूर महानगरपालिकेचे सहकार्य लाभले 

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कसबा बावडाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सोमवारी पंचगंगा घाट स्वच्छ केला.
    
या उपक्रमासाठी  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे या उपक्रमासाठी प्रोत्साहन तर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे सहकार्य मिळाले.

   अधिष्ठाता व जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर,  एन. एस. एस. प्रकल्प अधिकारी योगेश चौगुले, तुषार आळवेकर यांच्यासमवेत संकेत घाटगे, निकिता सावंत, सिद्धि पतकी, तनिषा मदाने, श्रेय वाघ, अथर्व गगाने, गौरव चौगले, अथर्व ढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.


अभियांत्रिकीच्या  विद्यार्थ्यांकडून पंचगंगा घाटाची स्वच्छता