बातम्या

कोल्हापूर शेतकरी संघाचे जागा अधिग्रहण केल्याने सभासदाचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा 

collecter office morcha


By Administrator - 9/27/2023 2:20:37 PM
Share This News:



कोल्हापूर शेतकरी संघाचे जागा अधिग्रहण केल्याने सभासदाचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा 

सहकार मोडीत काढणाऱ्या राज्यशासनाचा धिक्कार असो ,सहकार वाचवा ,जिल्हाधिकारी चले जावं अशा घोषणा देत मोर्चा 

जिल्ह्याधिकारानी शेतकरी संघाचे जागेवर दरोडा टाकून जागा ताबा घेतलेचा आरोप 


शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीमधील तीन मजले देवस्थान समितीने ताब्यात घेतल्याने वाद उफाळून आला आहे त्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे 


शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नाही तर त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला असून जिल्ह्यात आता कोणती आपत्ती आली म्हणून एवढ्या तातडीने जागा ताब्यात घेतली असा सवाल करत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना ही जागा बळकवायची आहे असा आरोप करण्यात आला आहे 

नवरात्र उत्सवात होणारी गर्दी तसेच सध्या असलेला दर्शन मंडप भाविकांना अपुरा पडत असलेने,   भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यानी  शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात केले आहे.  मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात संघाच्या सभासदांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात  सर्वपक्षीय नेते देखील सहभागी झाले होते

सहकार मोडीत काढणाऱ्या राज्य शासनाचा अधिकार असो, वाचवा वाचवा ,सहकार वाचवा जिल्हाधिकारी चले जाव यासह शेतकरी संघाच्या समर्थनात फलक हाती घेत मोठ्या संख्येने सभासद बांधव मोर्चात सहभागी झाले होते
 

शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले आहे त्याद्वारे मालकी बदलता येत नाही शेतकऱ्यांच्या हिताला कोणतीही बाधा पोचविण्याचा उद्देश देवस्थान समितीचा नाही राजश्री शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी मार्गावरच प्रशासन सदैव मार्गक्रमण करत राहील तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन समितीचे  सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे


कोल्हापूर शेतकरी संघाचे जागा अधिग्रहण केल्याने सभासदाचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा