राजकीय

आ. ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मतदारसंघाचा विकास: विजय निश्चित

come Development of South Constituency Under Rituraj Patil


By nisha patil - 10/11/2024 6:16:02 PM
Share This News:



आ. ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मतदारसंघाचा विकास: विजय निश्चित

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या विकासकामांमुळे मतदारसंघात सकारात्मक बदल दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

जवाहर नगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना आ. सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, "माझे यश जनतेच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आहे. पैसा किंवा प्रतिष्ठा यापेक्षा मी कमावलेली माणसं माझ्यासाठी मोठा आनंदाचा भाग आहे."

माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांनी देखील आ. ऋतुराज पाटील यांचे योगदान विशेष ठरल्याचे सांगत, "वीर कक्कर समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली आहे, तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे."

माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी ऋतुराज पाटील यांच्या उपनगर विकासासाठी दिलेल्या निधीचा उल्लेख केला. "उपनगरांमध्ये विकासकामांची मोठी कामगिरी झाल्यामुळे त्यांचा विजय हा विक्रमी मतांनी होणार आहे," असे ते म्हणाले.

वीरशैव कक्कया समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ यांनी ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी कक्कया समाज ठामपणे उभा असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित नागरिकांनी एकमुखाने ऋतुराज पाटील यांना आगामी निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमात निरंजन कदम, राजू साबळे, तुळशीदास व्हटकर, फिरोज सौदागर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


आ. ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मतदारसंघाचा विकास: विजय निश्चित