बातम्या
आ. विनय कोरे यांच्याकडून सभासदांना भेटवस्तूंचे वाटप..
By nisha patil - 1/20/2025 3:24:55 PM
Share This News:
आ. विनय कोरे यांच्याकडून सभासदांना भेटवस्तूंचे वाटप..
संस्थेच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना भेटवस्तू..
बांबवडे (ता. शाहूवाडी) . डी.आर. पाटील शाहूवाडी तालुका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूंचे वाटप आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक दिनकर पाटील, चेअरमन सदाशिव थोरात, व्हा. चेअरमन विठ्ठल धायतडक यांच्यासह साहेब शेख, जयसिंग पाटील, अशोक पाटील, बाळू पाटील, चंद्रकांत मुगडे, नंदकुमार शेळके, शिवाजी पाटील, अशोक माने, सुनिल नलगे, एम.आर. पाटील, दीपक वडाम, अलका थोरात, सुमन काळे, स्वाती दरबाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
आ. विनय कोरे यांच्याकडून सभासदांना भेटवस्तूंचे वाटप..
|