बातम्या
आठवड्यातून दोन दिवस इचलकरंजी रँपिअर कारखाने बंद ठेवण्याचा पावरलूम असोशियनचा निर्णय
By nisha patil - 6/27/2023 12:32:34 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : इचलकरंजी कापड उत्पादनाचा खर्च आणि मिळणारी मजुरी यातून उत्पादन खर्चही भागत नसल्यामुळे शुक्रवार व सोमवार असे दोन दिवस आठवड्यातून राँपेअर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी पावरलुम असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षांनी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे होते.रँपिअर कारखानदारांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मंदीचे वातावरण असून कापड उत्पन्नासाठी येणारा खर्च मिळणारी मजुरी यामध्ये मोठी तफावत होत आहे. त्यातून उत्पादनाचा खर्चही मिळत नसल्याने नुकसानीत व्यवसाय करावा लागत आहे. यावर योग्य निर्णय सर्वांमध्ये घ्यावा असे सांगितले यावर सखोल चर्चा होऊन प्रोग्रॅमची परिस्थिती सुधारेपर्यंत आठवड्यातून सोमवार व शुक्रवार दोन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विनोद शिंगे कुंभोज
आठवड्यातून दोन दिवस इचलकरंजी रँपिअर कारखाने बंद ठेवण्याचा पावरलूम असोशियनचा निर्णय
|