बातम्या
पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले
By Administrator - 6/1/2024 12:56:07 PM
Share This News:
पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले
हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने केली कारवाई
1989 पासून मदरसा कार्यरत असलेल्या मदरसावर कारवाई
पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या किल्ले पावनगडावरील अनधिकृत मदरसे, पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने मध्यरात्री कारवाई करून हटवण्यात आले
. हिंदूत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी नऊ वाजता संपली. किल्ले पावनगडावरील अनाधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आले आहेत . जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाच्या अधिकारी हे किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहे. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. पावनगडाकडे जाणारे सर्व मार्ग सध्या बंद करण्यात आले आहे
पावनगडावरील ही अनाधिकृत मदरसा 1989 पासून होता . त्यानंतर या मदरशावर कारवाई झाल्यानंतर हा मदरसा तीन ते चार वर्षे बंद करण्यात आला परंतु . पुन्हा एकदा मदरसा चालू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मदरशामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मुले शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या मदरशातील मुलांना हलवण्यात आले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पावनगडाचे इतिहासात विशेष महत्त्व
पन्हाळ गडाच्याशेजारी चार किलोमीटर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. शत्रूला चकवा देण्यासाठी हा गड बांधण्यात आला आहे. अनेक इतिहासाचे दाखले देखील या गडावर मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला विशेष महत्त्व आहे. अनेक हिंदूत्ववादी संघटनांनीअनधिकृत मदरसा संदर्भात आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून मदरसा हटवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सध्या या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे
पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले
|