बातम्या

हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे?

drink in winter


By nisha patil - 12/20/2023 7:30:28 AM
Share This News:



भारतात थंडी सुरु झाली आहे. हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांचा धोका देखील वाढतो. हिवाळ्यात आहारात तसा बदल करणे देखील महत्त्वाचे असते. तसे केले नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे जास्त तहान लागत नाही. त्यामुळं लोकं कमी पाणी पितात. पण कमी पाणी प्यायल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. कमी पाणी पित असाल तर त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. शरीरात ७० टक्के पाणीच असते. जी शरिराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे हिवाळ्यात किती पाणी प्यायला पाहिजे हे जाणून घेऊया.

डिहायड्रेशन होणे

हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीर निर्जलित होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.

युरिन इन्फेक्शन

कमी पाणी पिल्याने युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता ही वाढते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने मूत्राशय आणि त्याच्या नळीला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये महिलांना अधिक धोका असतो.

तोंडाची दुर्गंधी

पाणी कमी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. कमी पाणी प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते, ज्याचा आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर वाईट परिणाम होतो.

पोटाशी संबंधित समस्या

कमी पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित आजार उद्भवतात. पचनक्रिया कमकुवत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

लघवीला दुर्गंधी

पाणी कमी पित असाल तर लघवीला पिवळी होते. शिवाय दुर्गंधी देखील येते. असं होत असेल तर समजा तुम्ही कमी पाणी पित आहात.

त्वचेचे विकार

कमी पाणी पिल्यामुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय इतर त्वचेचे आजार देखील होऊ शकतात. चेहऱ्यावर मुरुमांची समस्या वाढू शकते.

किडनीवर वाईट परिणाम

शरीरात पाण्याची कमतरता आली तर त्याचा सर्वात आधी ताण हा किडनीवरच पडतो. जे चांगले लक्षण नाही.

एका दिवसात किती पाणी प्यावे

हिवाळ्यात स्वत:ला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज 7-8 ग्लास पाणी प्यावे. दर तासाला मध्ये मध्ये पाणी प्यायला हवे. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू शकते.


हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे?