बातम्या
रोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात 'हे' बदल!
By nisha patil - 9/24/2023 9:29:08 AM
Share This News:
आपल्याला जीवनशैलीत सध्या फार वेगवान बदल होताना दिसत आहेत. त्यातून आपल्याला आपली निरोगी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठीही विविध उपाय करावे लागतात. आहार, व्यायाम, योग्य झोप याची आपल्याला योग्य ती गरज असते.
त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्यही निरोगी ठेवता येते. तेव्हा चला तर मग पाहुया ओलं खोबरं खाण्याचे नक्की फायदे काय आहेत? तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल परंतु ओलं खोबरं खाल्ल्यानं तुम्हाला कमालीचे फायदे मिळतात. तुम्ही जर का रोज सकाळी ओल्या खोबऱ्याचे सेवन केलेत तर तुम्हाला तुमच्या शरीरासाठी कमालीचे फायदे मिळू शकतात. या लेखातून आम्ही तुम्हाला हे सविस्तर सांगणार आहोत. ओलं खोबरं आपण हे जेवणात हमखास वापरतो त्यातून ओल्या खोबऱ्याचा वापर हा आपण फक्त काही गोष्टी सर्व्ह करण्यासाठीही करतो.
उपमा, पोहे यांच्यावर आपण ओलं खोबरं खरवडून टाकतो. त्याचसोबत आपण वेगवेगळे पदार्थही बनवतो. नारळाचे दूधही आपल्यासाठी आरोग्यदायी असते. सोबतच ओल्या नारळाचे तुकडेही आपण खातो. नारळाचा वापर हा भाजीत, आमटीतही हमखास केला जातो. त्यामुळे आपल्या जेवणातही त्याची रंगत वाढते. त्यातून गोड पदार्थ हा आपल्या आवडीचा विषय आहे. नारळाच्या वड्या, त्यातून कुठल्या गोड पदार्थातही आपण नारळाचा वापर करून घेतो. याचा अर्थ हाच की जास्तीत जास्त प्रकारे आपण नारळाचा आपल्या आहारात फायदा करून घेत असतो. आपल्या स्वयंपाक घरात नारळाचा वापर हा सर्वप्रकारे होतच असतो. नारळाचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तेव्हा चला तर पाहुया की रोज सकाळी नारळाचं तुकडे खाऊन आपल्या शरीरात नक्की काय बदल होतात.ओल्या नारळात प्रोटिन्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. सोबतच ओल्या नारळात फॉस्फरस, कॉपर आणि एन्टीऑक्सिडंट्सही आहेत. ओल्या आणि सुक्या खोबऱ्याचे फायदे हे अनेक आहेत. त्यातून अनेकांना सुक्यापेक्षा ओलं खोबरं हे लोकांना अधिक खायला आवडतं.
काय आहेत फायदे?
ओलं खोबरं हे त्वचेसाठी फार चांगलं आहे. यात एन्टीबॅक्टेरिअल आणि एन्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा ही हायड्रेट राहते. तुम्ही सकाळी उपाशी पोटी जर का ओल्या खोबऱ्याचे तुकडे खाल्ल्यानं आपल्याला फार फायदा होता. आपलं वजन कमी होण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास चांगलीच मदत होते. सोबतच आपल्याला यातून अनेक त्रास आपले कमी होतात. भुक लागण्यासही मदत होते. आपल्या शरीरीतील नको ते पदार्थ बाहेर पडण्यासही मदत होते.
जर का तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन असा काही त्रास होत असले तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यावरही ओलं खोबरं हे फायदेशीर ठरते
रोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात 'हे' बदल!
|