बातम्या

मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो - अजित पवार

father implements it  Ajit Pawar


By nisha patil - 8/1/2024 3:52:57 PM
Share This News:



मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो - अजित पवार 

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. कोणाची कामे असली तर होणार असतील तर तो लागलीच करुन देतात. कमी होणार नसेल तर होणार नाही, असे स्पष्ट सांगतात. रविवारी अजित पवार ठाणे, कल्याण विभागात होते. या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. त्यानंतर सर्वसामान्यांना भेट देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील समस्या मांडली. तेव्हा मुख्यमंत्री एका मिनिटात हा प्रश्न सोडवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
     

कल्याण ग्रामीण परिसरातील वरप भागात आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरभरात बॅनर लागले होते. या परिसरात जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी आणि सामन्य लोकांनी अजित पवार यांना भेटून समस्या मांडल्या. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील समस्या मांडली. त्यावर अजित पवार यांच्यासमोर त्यांना रखडलेला विषय उपस्थित केला. यावेळी अजित पवार यांनी हे एक मिनिटाचं काम आहे, असे सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांनी हा निर्णय लागू केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी सांगिले की, ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ आहे. मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर तो कर्मचारी आनंदीत झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो - अजित पवार