मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था बागडी समाजासाठी लाभदायक ठरणार

fish farming


By Administrator - 12/6/2023 1:21:50 PM
Share This News:



मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था बागडी समाजासाठी लाभदायक ठरणार

महाराष्ट्र राज्यात मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था निर्मिती आणि संवर्धनासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. मच्छीमारांना आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या प्रादेशिक संचालकांनी ही योजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मच्छीमारांना सुलभ आणि कमी खर्चातून शाश्वत साधन देणे, त्यांचे उत्पादन वाढवणे, मच्छीमारांना आर्थिक तरलता, बाजार व्यवस्था, व्यवसाय कौशल्य शब्द वाढवणे इत्यादी उद्दिष्ट या योजनेचे आहेत.

यानुसार महाराष्ट्र राज्य बागडी समाज मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायिक संघाचे संस्थापक संजय शिंदे आणि अध्यक्ष विकास बागडी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा , चंदगड ,भुदरगड, गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले आणि गगनबावडा या सात तालुक्यांचे मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेचे प्रस्ताव योग्य कागदपत्रांसह सादर केले होते.

यापैकी आजरा, चंदगड, भुदरगड, शिरोळ, हातकणंगले या पाच तालुक्यांच्या मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र कोल्हापूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

. महाराष्ट्र राज्य बागडी समाज

यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त कोल्हापूर विभागाचे राजेंद्र भादुले, सहाय्यक मच्छी विकास अधिकारी सुदर्शन पावशे, सहाय्यक मच्छीविकास अधिकारी सतीश खाडे यांचे विशेष सहकार्य लाभलं.तसेच सहकारी संस्था दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, संजय  यांनी याबाबत मार्गदर्शन केलं

.या संस्थेमुळे आर्थिक विवंचनात पडलेले आणि नदी प्रदूषणाने हातबल झालेल्या बागडी समाजातील मच्छीमारांना लाभ होणार आहे. या संस्थांचे प्रमाणपत्र स्वीकारताना संजय शिंदे , विकास बागडी, विलास बागडी, शिवाजी बागडी, गुलाब बागडी यांच्यासह आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सहकारी संस्थांचे मुख्य प्रवर्तक आणि प्रवर्तक मंडळ बागडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था बागडी समाजासाठी लाभदायक ठरणार