विशेष बातम्या
व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणंसध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या
By nisha patil - 6/17/2023 8:28:32 AM
Share This News:
मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनत चालली आहे.
तसंच दररोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामही करायला वेळ मिळत नाही त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहत नाही. मग आपले वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. जर तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं तर हे पाच पांढरे पदार्थ खाणं टाळा जेणेकरून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकाल.
तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात बदल करावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या आहारातून पाच पांढरे पदार्थ काढून टाकावे लागतील. या संदर्भात वेदांत हॉस्पिटलचे एंडोवस्कुलर डॉ. राजीव पारख यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी वजन कमी करण्यासाठी आहारातून पीठ, तांदूळ, साखर, दूध आणि मीठ या पदार्थांना वगळण्यास सांगितलं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी पिठापासून बनवलेले पदार्थ , पांढरा भात, साखर आणि साखरेचे पदार्थ तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ आणि मीठ खाणं बंद करावं. विशेषतः रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाणं बंद करावे असं केल्याने तुमचे वजन सहज कमी होईल आणि त्याचा प्रभाव तुम्हाला एका आठवड्यात दिसून येईल.
पुढे डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या चार तास आधी जेवण करा. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नका कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्याने वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे तुम्ही जर ही चूक करत असाल तर ती लगेच सुधारा त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागेल. टाळा. जाणून घ्या!
लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर त्वचा, केस निरोगी करण्यासाठीही लिंबाचा वापर केला जातो, कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रेट ॲसिड असते.
अशावेळी जर तुम्हाला तुमचा रंग सुधारायचा असेल तर चेहऱ्यावर लिंबू व्यवस्थित लावा. अशा तऱ्हेने आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत की चेहऱ्यावर लिंबू कसे लावावे? आणि कोणत्या गोष्टींचे त्यात मिश्रण केले पाहिजे?
लिंबू आणि तांदळाचे पीठ
तांदळाचे पीठ लिंबाच्या रसात मिसळून चेहऱ्यावर टाकल्यास तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल. ते लावण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ घ्या. त्यात लिंबाचा रस आणि अर्धा चमचा गुलाबजल घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका.
लिंबू आणि साखर
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लिंबामध्ये साखर देखील मिक्स करू शकता. ते लावण्यासाठी एक चमचा साखर घ्यावी. त्यात कोरफड जेल आणि लिंबाचा रस मिसळा, आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यानंतर हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने मृत त्वचेपासून सुटका मिळेल.
लिंबू आणि ग्रीन टी
तुम्ही लिंबामध्ये ग्रीन टी मिसळू शकता. यासाठी एक कप ग्रीन टी घ्या, त्यात लिंबाचा रस आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवून टाका.
व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणंसध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या
|