बातम्या
‘ही’ चार सोपी योगासनं करा अन् राहा फिट!
By nisha patil - 4/7/2023 7:16:15 AM
Share This News:
व्यायाम, योगा करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं आपल्याला अनेजण सांगतात. किंबहुना आपल्यालाही ते माहिती असतं. पण अनेकदा आपण त्याकडं दुर्लक्ष करतो. आळस हे त्याचं एक कारण असलं तरी योगा करण्यात सातत्य राखण्यात आपल्याला कठीण जातं. पण आज जागतिक योग दिन आहे. त्या निमित्त आम्ही तुम्हाला अगदी सोपी चार आसनं सांगणार आहोत. जी तुम्ही अगदी सहज करू शकता आणि या योगासनांना दररोज केल्यास तुम्ही अगदी फिट राहाल!1. सुखासन
सुखासन ही एक योग मुद्रा आहे. याचा अर्थ आरामात बसून राहाणं होय! हे आसन तर तुम्ही अगदी सहज करू शकता. शिवाय कुठल्याही वयोगटाची व्यक्ती हे आसन करू शकते. हे आसन केल्यानं घोटा आणि गुडघ्यांमध्ये ताण निर्माण होतो. त्याच बरोबर पाठ सरळ आणि मजबूत राहण्यास मदत होते. हे आसन रोज केल्यास अनेक आजार दूर राहतात.
2. वृक्षासन
‘वृक्षासन’ हे देखील योगामधलं महत्त्वाचं आसन आहे. या आसनाला वृक्ष या शब्दावरून नाव देण्यात आलं आहे. याचा अर्थ एखाद्या झाडा प्रमाणे उभं राहाणं होय. या आसनात शरीराचा समतोल राखण्याची कसरत असते. पण हे आसन केल्यानं मांड्या, पाठीचा कणा आणि घोटे मजबूत होतात. छाती, खांदे आणि मांड्यामध्ये एक ताण निर्माण होतो. या आसनाच्या मदतीने शरीराचा समतोल राखण्यास मदत होते.3. पदहस्तासन
पदहस्तासन म्हणजे पायांना हाताने स्पर्श करणं. पदहस्तासन या आसनामुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याचं काम हे आसन करतं. हे आसन केल्यामुळे पाठ, घोट्यांमध्ये ताण निर्मा होतो. मन शांत होतं आणि मनातील चिंता-तणाव दूर होतात. तुम्हाला तर सतत डोकेदुखी आणि झोप न लागण्याची समस्या सतावत असेल तर हे आसन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय किडनी आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे.
4. वज्रासन
शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी वज्रासन हे उत्कृष्ट योगासन आहे. जेवल्यानंतर हे आसन केलं तर अन्न लवकर पचतं. शिवाय पचनक्रियाही सुरळित राहाते. गुडघेदुखी त्रास जाणवत असल्यास हे आसन तुम्हाला उपयुक्त आहे. याशिवाय मांड्यांचे स्नायू या आसनामुळे बळकट होतात. वज्रासनामुळे पाठदुखीचा त्रास कमी होतो. पचनक्रिया सुधारते.
‘ही’ चार सोपी योगासनं करा अन् राहा फिट!
|