बातम्या

व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक?

g after exercise beneficial or harmful


By nisha patil - 10/10/2023 8:37:34 AM
Share This News:



आपल्या शरीराचा बराचसा भाग पाण्याने व्यापलेला असतो, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा आणि चिडचिड अशा समस्या निर्माण होऊ लागतात.

बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की निरोगी व्यक्तीने दिवसभरात फक्त 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. आता जिममध्ये व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी प्यायचे की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

व्यायाम करताना पाणी पिणे योग्य आहे का?

जेव्हा आपण जिममध्ये घाम गाळतो तेव्हा आपल्याला पाणी पिण्याची आवश्यकता वाटते. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. हृदयाचे ठोके नॉर्मल झाले तर मधल्या काळात पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार आपण लगेच पाणी टाळले पाहिजे. पाण्याचे छोटे-छोटे घोट घ्यायला हवेत.

जिमनंतर लगेच पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक?

जिम केल्यानंतर लगेचच तुमचे शरीर गरम कढईसारखे असते, त्यावर लगेच पाणी प्यायले तर नुकसान होणारच. व्यायामानंतर लगेच पाणी पिण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा.
वर्कआऊट नंतर शरीराला थोडी विश्रांती द्या, घाम निघून गेल्यावरच पाणी प्या आणि हृदयाचे ठोके नॉर्मल होतात.
घाईगडबडीत पाणी पिऊ नका, आरामात पाणी प्यायल्याने शरीराचे नुकसान होत नाही.
बसून आरामात पाणी प्या, असं केल्यास पाणी शरीराच्या बहुतांश भागांपर्यंत पोहोचते.
जिम केल्यानंतर नॉर्मल पाणी प्या, फ्रिजचे थंड पाणी हे कधीच चांगले नसते.
पाण्यात लिंबू आणि काळे मीठ मिसळा, यामुळे घामामुळे बाहेर पडणारे इलेक्ट्रोलाइट्स भरून निघतात.


व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक?