बातम्या
छत्रपती शाहू विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
By Administrator - 9/22/2023 12:24:26 PM
Share This News:
छत्रपती शाहू विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
रौप्य मोहोत्सव भेट म्हणून सभासदांना रोख शेअर्स ६% व डिव्हीडंड ६%असे १२%चे गिफ्ट
मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर चेअरमन एम. एस. भवड.
बालिंगा / वार्ताहर.
बालिंगा. ता. करवीर. येथील छत्रपती शाहू विकास सेवा संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन एम. एस. भवड. होते. व्हा. चेअरमन जनार्दन जांभळे. यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.
संस्थेने 25 वर्षे पूर्ण करून 26 व्या वर्षात पदार्पण केल्याने संस्थेने रौप्य महोत्सव भेट म्हणून सभासदांना रोख शेअर्स ६%व डिव्हीडंड ६%असे १२%चे गिफ्ट देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला
तसेच मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठा आरक्षणाला एकमुखी पाठिंबा देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
चेअरमन एम. एस. भवड यांनी संस्थेच्या ताळेबंदाचे वाचन केले, तसेच त्यांनी संस्थेला सन 2022/2023 सालात रुपये 3,10,406 /-इतका नफा झाला. असल्याचे सांगून संचालक मंडळाने व्यवस्थापन खर्च कमी करून पारदर्शक कारभार , कामकाज केल्याने संस्था कौतुकास पात्र ठरली आहे असे मत व्यक्त केले तसेच संस्थेने सलग 14 वर्षे 100 % वसुली केली आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले
.या वार्षिक सर्वसाधारण सभेला संचालक भाऊसो जाधव, अनिल पोवार, श्रीकांत भवड, मधुकर जांभळे, अनिल कोरे, गुंडा माळी, बाबू जांभळे, सदाशिव कांबळे, युवराज बागडी, सुमन ढेंगे, आक्काताई माळी, तज्ञ संचालक बाबासो जाधव, सुभाष मोहिते, सचिव - संजय जाधव, क्लार्क - सचिन माळी. आदिसह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
या सभेचे स्वागत चेअरमन एम. एस. भवड. यांनी केले तर आभार सचिव संजय जाधव. यांनी मानले.
छत्रपती शाहू विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
|