बातम्या
कॅप ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत गुरुवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन
By Administrator - 7/17/2023 3:19:39 PM
Share This News:
‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत गुरुवारी*
*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन*
कोल्हापूर/प्रतिनिधि
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) कसबा बावडा यांच्यावतीने अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबाबत गुरुवार दि 20 जुलै रोजी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता होणाऱ्या या सेमिनारमध्ये डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता या संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
अभियांत्रिकीच्या 2023-24 या वर्षीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) कशा प्रकारे राबवली जाईल, मेरीट लिस्ट कशी वाचावी, ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी, महविद्यालयाला प्राधान्य द्यावे कि आवडत्या शाखेला, कॅपच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन ऑप्शन कसा भरावा, अलॉटमेन्टचे टप्पे व नियम, स्वयं पडताळणीची प्रक्रिया, सीट अॅक्सेप्टन्स टप्पा, अग्रगण्य महाविद्यालयाची कट ऑफ लिस्ट, ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या कोणत्या चुका टाळाव्यात आदी मुद्द्यावर यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरणे ही अभियांत्रिकी प्रवेशाची अत्यंत महत्वाची पायरी आहे. हा फॉर्म भरताना कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी विद्यार्थी व पालकांच्या शंकांचेही निरसन केले जाणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी किंवा ९१५८९१५९९९, ९१५८६१५९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अॅडमीशन विभाग प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी यांनी केले आहे.
guidance for cap option form in d y patil
|