बातम्या

गुंफण अकादमीचे पुरस्कार जाहीर...

gunfan puraskar


By Administrator - 1/21/2024 5:17:18 PM
Share This News:



गुंफण अकादमीचे पुरस्कार जाहीर...

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) – गुंफण अकादमीच्यावतीने या वर्षीच्या  एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सात जणांना गुंफण जीवनगौरव पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.  सदरचे संमेलन दिनांक  २७ आणि २८ जानेवारी रोजी वाशी येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष बी .ए . पाटील आणि अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी संमेलनात प्रा. डॉ. जे .के.पवार (कोल्हापूर) , प्रा. डॉ. महादेव सगरे(पुणे), विनोद नाईक(गोवा), भीमराव उर्फ बी . ए .पाटील(वाशी), सुजित शेख(सातारा), प्राध्यापक संजीव पवार(पुणे) आणि पत्रकार गुरुबाळ माळी(कोल्हापूर) आदींना  सन्मानित करण्यात येणार आहे.


गुंफण अकादमीचे पुरस्कार जाहीर...