बातम्या
हे 5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी
By nisha patil - 11/21/2023 7:32:16 AM
Share This News:
1. ताडासन
ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे.ताडासन करण्याची पद्धत:
ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहावे. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे.
सावधगिरी :
हात डोक्याच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचे वजन हे पायाच्या बोटांवर असते. जेव्हा हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र पोट हे आतल्या बाजूला घेतले पाहिजे. ताडासनाचे फायदा :
ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. वीर्यशक्तिमध्ये वाढ होऊन मुळव्यधी असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.2. भुजंगासन
या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले. आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावे.
आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे. हे आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकता.
सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते, आणि आपण सुडौल दिसायला लागता.
ही काळजी आवश्यक घ्या:
हे आसन करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे मागे झुकण्याचा प्रयत्न मुळीच करू नाक, अन्यथा तुमच्या पाठीवर त्याचा ताण निर्माण होईल. ज्यांना पाठीचे दुखणे आहे, त्यांनी डॉक्टर अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम करावा. 3. उष्ट्रासन
या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात.
कृती : सुरवातीला वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहा. सहाजिकच पाय मागे रहातील.
आता दोन्ही हात समोर न्या. त्यानंतर हात कानावरून मागे घ्या. त्यानंतर शरीराचा पुढील भाग हळू हळू मागे झुकविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातही पूर्णपणे मागे न्या. आता हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करा. मानही मागे वळवा आणि डोकेही मागे न्या. तुमचे शरीर आता मागच्या बाजूला झुकलेले असेल.
या आसनातून बाहेर येताना दोन्ही हात एकाचवेळी पुन्हा पुढे येतील आणि त्यानंतर वज्रासनातून बाहेर या.
सूचना : हे आसन करण्यासाठी शरीराला जास्त ताण देऊ नका. मागे झुकताना मांड्या सरळ ठेवा. अंतिम स्थितीत मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ येणे अपेक्षित आहे. आसनस्थितीतून परतताना सावधगिरी बाळगा. हार्नियाचा त्रास असणार्यांनी हे आसन करू नये.
लाभ : या आसनामुळे गुडघे, ब्लडर, किडनी, यकृत, लिव्हर, फुप्पुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. श्वास, पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ट, अपचन, एसिडिटी दूर होण्यास मदत होते. 4. गोमुखासन
पादो भूमौ च संस्थाप्य पृष्ठपाश्र्वे निवेशयेत।
स्थिरकायं समासाद्य गोमुख गोमुखाकृति:।।
एका पायाची टांच शिवणीला लावून दुसरा पाय त्यावरून गुडघ्यावर गुडघा येईल अशा त-हेने ठेवून शरीर साधे सरळ ठेवून बसल्यास गोमुखासद्दश्य आकृती दिसते.
गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनांत पायाची रचना गोमुखासारखी भासते व पावले तिच्या कानाप्रमाणे वाटतातत म्हणून या आसनास गोमुखासन नाम प्राप्त झाले आहे. हठयोगप्रदीपीका व घेरंडसंहिता या दोन्ही ग्रंथामध्ये या आसनाचा उल्लेख आहे.
कृती: पाय लांब करून बैठकास्थिती हळूच उजवा पाय उचलून डाव्या पायाखालून डावीकडे त्यांच्या टाच वाकवून उजव्या पायावरून उजवीकडे नेऊन त्यांची टाच नितंबास चिटकून ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायावरून उजवी कडे नेऊन त्याची टाच उजव्या नितंबाला चिटकून ठेवा दोन्ही गुडघे एकमेकावर दिसतील अशी पायाची स्थिती ठेवा. डावा हात वर करा व कोप-यात वाकवून पाठमागे घ्या व डावे कोपरे डोक्यामागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीमागे घ्या व तळहात वर सरकून दोन्ही हाताची बोटे एकमेकात बसवून घट्ट पकडा. शरीर ताठ परंतु शिथील ठेवा सावकाश डोळे मिटून घेऊन संथ श्वसन चालू ठेवत हे आसन अर्धा ते एक मिनिटापर्यंत करात येणे शक्य आहे. सरावाने जास्त वेळ देखील करणे शक्य आहे. आसन सोडताना हात सोडा मग बैठक स्थितीत या . हे आसन विरूद्ध बाजूने देखील करता येणे शक्य आहे.
लाभ: छातीच्या वरचा भाग खांदे मान दंड यांच्या स्नांयुना ताण पडून व्यायाम मिळतो व बळकटभ येते मानेचे विकार कमी होतात. पाठदुखी थांबते कुबड येऊ नये किंवा कुबड असल्यास ते कमी व्हावे म्हणून भुजंगसासनाबरोबर या आसनाचा उपयोग होतो. मन प्रसन्न होते. व ताजेतवाणे वाटते. एकाग्रता व मन:शांती करिता हे आसन उपयुक्त.
सावधान: आसन करताना अवाजवी ओढाताण करू नये त्यामुळे खांद्यास दुखापत होण्यास संभव असतो पाठीच्या मणक्याचे विकार असणा-यांणी हे आसन करू नये किंवा तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे.5. शवासन
शव म्हणजे अर्थातच मृतदेह. आपल्या शरीराला मृतावस्थेसारखे करणे म्हणजेच शवासन.
कृती- या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर व टाच आत असायला हवी. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ व डोळे बंद हवेत.
पूर्ण शरीर सैल सोडून द्या. त्यानंतर संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रीत करा. श्वास आत येणे व बाहेर जाण्याच्या प्रक्रियेवर नीट लक्ष द्या. श्वास आत येताना हळूवर थंडपणा जाणवतो, त्याचा अनुभव घ्या. त्याचवेळी श्वास बाहेर सोडताना हलका गरमपणा जाणवतो, तोही अनुभवा.
यानंतर अनुक्रमे छाती व नाभीवर लक्ष केंद्रीत करा. मनात शंभरापासून एकपर्यंत उलट्या क्रमाने आकडे मोजा. आकडे मोजण्यात चुक झाल्यास शंभरापासून पुन्हा सुरू करा.
सूचना- या आसनात डोळे बंद हवेत. हात शरीरापासून सहा इंच दूर व पायात एक ते दीड फूट अंतर हवे. शरीर पूर्णपणे सैल सोडले पाहिजे. श्वास घेताना शरीर हलवू नका. आपले लक्ष पूर्णपणे शरीरावर हवे. मनातल्या विचारांवर नाही. त्यामुळे श्वास घेण्यातली सहजता अनुभवा.
फायदा- मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, निद्रानाश यावर हे आसन उपयुक्त आहे.
या आसनात मन शरीराशी जोडले गेलेले असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे मन विश्रांत अवस्थेत असते. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.
हे 5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी
|