बातम्या
शिरढोण तलाठी मंडळ अधिकारी यांचा मनमानी कारभार
By Administrator - 9/26/2023 6:51:45 PM
Share This News:
शिरढोण तलाठी मंडळ अधिकारी यांचा मनमानी कारभार
दोन ऑक्टोबरला शिरोळ तहसीलकार्यालयासमोर करणार आमरण उपोषण
न्यायप्रविष्ठ प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप
शिरढोण (संजय गायकवाड)
शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी चुकीचा फेरफार करून अन्याय केला आहे. त्यामुळे या चुकीच्या फेरफराची चौकशी होवून तो दुरुस्त करून मिळावा तसेच गाव चावडीच्या दप्तराची तपासणी करून दोषींवर कारवाई व्हावी
या मागणीसाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर २ आॅक्टोबर रोजी कुटुंबासह प्राणांतिक उपोषणास बसणार असल्याचे निवेदन येथील अपंग खातेदार सतीश दत्ता चौगुले व सारीका सतीश चौगुले या दाम्पत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे दरम्यान अपंग खातेदाराची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याने अपंग संघटना आक्रमक झाली आहे.
निवेदनात येथील गट नंबर २४ या शेतजमिनीबाबत कुरुंदवाड दिवाणी न्यायालयात तडजोड हुकुमनामा झाला आहे. या हुकुमनाम्याची फेरफार अद्याप प्रलंबित आहे. असे असताना शेत मिळकती संदर्भात शांताबाई मारुती चौगुले यांचे नावे २००६ साली चुकीची फेरफार पुणे अप्पर आयुक्तांने रद्द केली होता . मात्र गट नंबर २४ ला तलाठ्याने नोंदविलेल्या फेरफारला कुरुंदवाड न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
दत्तक पत्र फेरफार नोंद करते वेळी जे प्रतिज्ञापत्र केले आहे त्यावर शांताबाई चौगुले यांची सही अथवा अंगठा नाही. तसेच २००७ मध्ये कृष्णा शेणवडे यांना शांताबाई चौगुले यांनी वटमुखत्यारपत्र करून दिले आहे त्यात शांताबाई यांनी मारुती चौगुले यांना एकटीच वारस असल्याचे म्हटले आहे.तलाठी व मंडल अधिकारी यांना हाताशी धरुन कागदोपत्री गुंतागुंत करुन कोर्टात पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे
वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयात दाद मागून देखील आपण चुकीचा अहवाल सादर करून आमची दिशाभूल करत आहात. गट न २४ मधील वारसा फेरफार नंबर १५२५४ नोंद नामंजूर करण्यात यावी दरम्यान बेकायदेशीर काम करुन अपंग खातेदाराला भूमीहीन करण्याचा घाट घालणाऱ्या तलाठी व मंडल अधिकारी यांची चौकशी होवून कारवाई व्हावी व न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.
शिरढोण तलाठी मंडळ अधिकारी यांचा मनमानी कारभार
|