बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना कसबा सांगाव येथील कुटुंबाचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न

immolation by a family in Kasba Sangaon with children while Deputy Chief Minister Ajit Pawar was present


By nisha patil - 1/29/2024 6:26:36 PM
Share This News:



कोल्हापूर – आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्या अनुषंगाने ते आज सकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये  असताना कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील  सागर पुजारी यांनी आई, पत्नी आणि दोन लहान मुलांसह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खळबळ उडाली.यावेळी पोलिसांनी  त्यांना रोखलं  असून त्यांना ताब्यात घेतले आहे. परंतू उपमुख्यमंत्री अजित पवार  उपस्थित असताना असा प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला.

सागर पुजारी यांचे कसबा सांगाव येथील  घर अतिक्रमणात असल्याचं सांगून  पाडण्यात आलय. ते  घर पाडल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. केलेली करवाई चुकीची असल्याचा आरोप करत  पुजारी यांनी कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.


उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना कसबा सांगाव येथील कुटुंबाचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न