बातम्या
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारपासून राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्नोत्सव’
By nisha patil - 9/2/2024 1:38:18 PM
Share This News:
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारपासून राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्नोत्सव’
कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत "टेक्नोत्सव २०२४" या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
महाविद्यालयाचा आर्किटेक्चर विभाग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, केमिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, मेकॅनिकल आदी अभियांत्रिकी विभागांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून इंडस्ट्री मधील विविध समस्या सोडविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेकरिता राष्ट्रीय स्तरावरील विविध महाविद्यालयानी सहभाग नोंदवला असून दीड लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकरिता जगविख्यात ‘प्राज इंडस्ट्री’चे मानव संसाधन विभाग प्रमुख मिलिंद बावा, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, समन्वयक डॉ.के. टी.जाधव, रजिस्ट्रार, डॉ.लीतेश मालदे आणि विविध विभागाचे अधिष्ठाता तसेच विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध स्पर्धांसाठी आमंत्रित समीक्षक उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात येथील विविध संस्थेचे विद्यार्थी सदर स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेत जास्तीत जात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली कौशल्य सदर करावी असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक डॉ.के. टी.जाधव यांनी केले
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारपासून राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्नोत्सव’
|