बातम्या
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विविध ऑनलाईन कोर्सेसना प्रारंभ
By nisha patil - 12/20/2023 6:06:53 PM
Share This News:
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये . विविध ऑनलाईन कोर्सेसना प्रारंभ
कसबा बावडा/ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांच्या विविधांगी विकासासाठी आणि ऑनलाईन इंटर्नशिपसाठी एन.पी.टी.एल, एज्युस्कील, आयआयटी बॉम्बे सारख्या ख्यातनाम
संस्थाबरोबर सामंजस्य करार केला आहे.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठातर्गत चालू शैक्षणिक वर्षापासून स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटची सुरुवात झाली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक व तंत्रज्ञानपूर्वक नवे ज्ञान मिळावे यासाठी महाविद्यालयाकडून विविध तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. त्याचाचा पुढील भाग म्हणून विविध संस्थासोबत माहिती, तंत्रज्ञान व ज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत विविध ऑनलाईन कोर्सेससाठी महाविद्यालयाच्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर ऍडव्हान्स कोर्सेस या माध्यमातून शिकता येणार आहेत. हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळणार असून जॉब प्लेसमेंटसाठी तसेच ॲडव्हान्स नॉलेज मिळवण्यासाठी या अभ्यासक्रमांचा फायदा होणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहेत.
या सर्व प्रोसेसमध्ये समन्वयक म्हणून डॉ. विनायक पुजारी काम पाहत आहेत. त्याना प्रथम वर्ष विभाग प्रमुख अभिजित मटकर आणि डेप्युटी रजिस्ट्रार आश्विन देसाई यांचे सहकार्य लाभले. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट चे संचालक डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
पणजी: एज्युस्कील सोबत सामंजस्य करारावेळी डॉ. अजित पाटील.
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विविध ऑनलाईन कोर्सेसना प्रारंभ
|