बातम्या
डी.वाय.पाटील स्कुल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 10/16/2023 8:16:57 PM
Share This News:
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रभारी संचालक डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
डॉ. अजित पाटील म्हणाले, वाचन हे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचे आहे. उत्तम साहित्य वाचल्याने मन व बुद्धीचा विकास होतो. त्यामुळे सर्वांनी किमान एक तास तरी अवांतर वाचन करावे. अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास नक्कीच मदत होईल.
सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विषद केले. तरुणांनी एकत्र येऊन काम केल्यास भारत नक्की महासत्ता बनणार यावर डॉ कलाम यांचा दृढ विश्वास होता. त्यासाठी तरुणांना शालेय जीवनात वाचनाचा छंद लागला पाहिजे असे ते म्हणत. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो, त्यामुळे आज कलाम यांच्या जन्मदिनी सर्वांनी वाचनावर भर देण्याचा संकल्प करुया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डेप्युटी रजिस्टार अश्विन देसाई, विभाग प्रमुख अभिजीत मटकर, ग्रंथपाल अक्षय भोसले, सहाय्यक ग्रंथपाल संकेत लांडगे व सहाय्यक प्राध्यापक अमित कदम, रवींद्र हुद्दर, ब्रिजेश पाटील, अनिश सिंग यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कोल्हापूर: डॉ. कलाम यांना अभिवादन करताना डॉ. अजित पाटील, श्रीलेखा साटम, अश्विन देसाई, अभिजीत मटकर, अक्षय भोसले आदी.
डी.वाय.पाटील स्कुल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
|