बातम्या
एकटं राहिल्याने वाढतो मानसिक विकाराचा धोका
By nisha patil - 6/1/2024 7:23:07 AM
Share This News:
एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, एकटे राहणारी व्यक्ती मानसिक समस्यांना लवकर बळी पडते. सर्व वयाचे स्त्री-पुरूषांना हा धोका असू शकतो. वैश्विक स्तरावर सामान्य मानसिक विकाराचा दर जवळपास ३० टक्के आहे. या मानसिक विकाराचा आपल्या जीवनावर गंभीर प्रभाव पडतो. लोकांसोबत उठण्या-बसण्याने एकटेपणातून बाहेर येण्यास मदत होते.
या प्रयोगासाठी संशोधकांनी १६ ते ६४ वयोगटातील २० हजार ५०० लोकांच्या माहितीचे श्लेषण केले. या सर्वच लोकांनी १९९३, २००० आणि २००७ साली नॅशनल सायकियाटिक मॉर्बिडिटी सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. या संशोधनात न्यूरोटिक लक्षणांवर केंद्रित प्रश्नावली क्लिनकल इंटरव्ह्यू शेड्यूल-रिवाइज्डचा उपयोग मानसिक विकाराचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आला.
या अभ्यासातून असे स्पष्ट झाले की, १९९३, २००० आणि २००७ मध्ये एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये मनोविकाराचा दर क्रमश: ८.८ टक्के, ९.८ टक्के आणि १०.७ टक्के होता. तसेच अभ्यासकांना एकटे राहणारे आणि सामान्य मनोविकार यांच्यात एक संबंध आढळून आला. लोकांच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ए कटेराहणाऱ्या लोकांमध्ये मानसिक विकाराचा धोका १.३९ ते २.४३ टक्के वाढतो.
एकटं राहिल्याने वाढतो मानसिक विकाराचा धोका
|