बातम्या

प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे महालक्ष्मी मंदिरामध्ये पूजन 

invetation for ramlalla pujan


By Administrator - 1/1/2024 6:27:16 PM
Share This News:



 प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे महालक्ष्मी मंदिरामध्ये पूजन 

अयोध्येतील 22 जानेवारीच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी दिली  निमंत्रण पत्रिका

कोल्हापूर, दिनांक १ जानेवारी २०२४ -श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये अयोध्येतील 22 जानेवारीच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे पूजन करुन महालक्ष्मी व परिक्रमेतील सर्व देवतांना अक्षता,  निमंत्रण पत्रिका व राम मंदिर प्रतिमा देऊन आमंत्रित करण्यात आले. 

या अक्षता कलशाची मंदीर परिसरात पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी या अक्षता कलशाचे दर्शन घेऊन आमंत्रण स्वीकारले.

या वेळी  रा स्व संघ शहर संघचालक श्री प्रमोदराव ढोले, श्री पूजक केदार मुनीश्वर, ऐश्वर्या मुनिश्वर, संतोष घोडगिरिकर, रणजीत घाटगे, संतोष अतिग्रे तसेच प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 


प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे महालक्ष्मी मंदिरामध्ये पूजन