राजकीय
शिवाजी स्टेडियमचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा : आमदार जयश्री जाधव
By Administrator - 2/24/2024 3:08:19 PM
Share This News:
शिवाजी स्टेडियमचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा : आमदार जयश्री जाधव
स्टेडियमच्या कामाची केली पाहणी : ठेकेदार व अधिकारी यांना धरले धारेवर
पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा, कुणाच्याही सांगण्यावरून काम बंद ठेवण्याची गरज नाही, विकासाच्या आडवे कोण येत असेल तर त्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी दिला.
शिवाजी स्टेडियमचे काम बंद ठेवण्याची सूचना देणाऱ्या वाघाचं मांजर करण्यासाठी कोल्हापुरातील खेळाडू दांडका घेऊन उभे आहेत. त्यांनी मैदानावर येऊन दाखवावेच असे आवाहन यावेळी खेळाडूंनी दिले.
शिवाजी स्टेडियमचे काम बंद आहे. यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार व खेळाडू यांच्यासह मैदानाची पाहणी केली. आणि अनेक प्रश्न उपस्थित करत ठेकेदार व अधिकारी यांना धारेवर धरले.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे. स्टेडियमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी एक कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या कामाची सुरुवात झाल्यानंतर कोणाच्यातरी सूचनेवरून काम बंद ठेवण्यात येते की बाब संतापजनक आहे. पंधरा दिवस काम बंद आहे, यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले. यांची जबाबदारी कोणी घेणार.
हे सार्वजनिक काम आहे, माझ्या घरचे नाही. काम त्वरित सुरू करा, मशनरी व मनुष्यबळ वाढवा, काहीही करा पण 15 एप्रिलपर्यंत गुणवत्तापूर्ण काम झालेच पाहिजे अशी सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिली.
आर्थिक मागणीतून स्टेडियमचे काम बंद ठेवणाऱ्याचे नाव जाहीर करा, कोल्हापूरातील जनतेकडून भीक मागून त्यांना पैसे देऊ अशा प्रतिक्रिया यावेळी खेळाडूंनी व्यक्त केल्या.
स्टेडियमचे काम बंद ठेवण्याची सूचना देणारा वाघ कोण आहे, त्याचे पद काय, त्याला तो अधिकार आहे का, त्या वाघाला एकदा स्टेडियममध्ये आणा, त्याच मांजर करण्यासाठी आम्ही दांडक घेऊन सज्ज आहोत असा इशारा यावेळी खेळाडूंनी दिला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर, राजेंद्र वारके, ठेकेदार मिलिंद निकम, पीटीएमच्या अध्यक्ष राजू ठोंबरे, दिलबहारचे कोच धनाजी सूर्यवंशी, बालगोपालचे आशिष कारेकर, सतीश आडनाईक, राजू काशीद, शिवाजी पाटील, सुनील ठोंबरे, प्रमोद भोसले, सचिन निकम, राजेश बाणदार, सचिन कुराडे, प्रमोद भोसले, महेश जाधव, अभिजीत पवार, संदीप पवार, स्विमिंगचे कोच प्रभाकर डांगे, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, सोहम कारेकर, अरुण पाटील यांच्यासह बाराईमाम तालीम, दिलबहार तालीम, सुबराव गवळी तालीम, बालगोपाल तालमीचे खेळाडू, क्रिकेट व फुटबॉलचे खेळाडू आणि मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक उपस्थित होते.
शिवाजी स्टेडियमचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा : आमदार जयश्री जाधव
|