बातम्या

जे. जे. हॉस्पिटलमध्ये हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात : ना.हसन मुश्रीफ

kidney and liver transplant surgery should be done in the hospital


By nisha patil - 1/18/2025 4:03:24 PM
Share This News:



जे. जे. हॉस्पिटलमध्ये हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात : ना.हसन मुश्रीफ

रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल : ना.हसन मुश्रीफ

वैद्यकीय महाविद्यालयात ई- भूमिपूजन कामाचे उद्घाटन मुश्रीफांच्या हस्ते

मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल या रुग्णालयात हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी रुग्णालयास आवश्यक साधन सामग्री उपलब्ध दिली जाईल. तसेच सर जे. जे. समूह रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरण करावे, यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन ना.हसन मुश्रीफांनी दिले. वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाचे ना.हसन मुश्रीफांच्या हस्ते ११ कोटी ७४ लाख किमतींच्या कामांचे उद्घाटन आणि २०५ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या कामांचे ई- भूमिपूजन करण्यात आलंय.

रुग्णालयात येणाऱ्या सामान्य माणसाला उत्तम प्रकारचे उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका यासह सर्वच घटकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचे दुत आपली सेवा बजावावी, असे आवाहन मुश्रीफांनी केलय. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याठिकाणी सुरू असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अशा सूचनाही दिल्या. या कार्यक्रमास आमदार मनीषा कायंदे, अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त राजीव नीवतकर, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

 


जे. जे. हॉस्पिटलमध्ये हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात : ना.हसन मुश्रीफ
Total Views: 65