विशेष बातम्या

अखेर कोल्हापूरला मिळाल्या आयुक्त

kolhapur muncipal ayuktya


By Administrator - 8/22/2023 2:00:33 PM
Share This News:



अखेर कोल्हापूरला मिळाल्या आयुक्त

के.मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदी के मंजू लक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या वतीने आज काढण्यात आले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या बदलीनंतर गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद रिक्त होतं त्यामुळे विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांतून कायमस्वरूपी आयुक्त मेळावा अशी संतप्त मागणी होत होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात मुंबईला गेल्यानंतर आयुक्त देण्याची ग्वाही दिली होती अवघ्या सात दिवसात अजित पवार यांनी आपला शब्द पाळत कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त तथा प्रशासक उपलब्ध केले आहेत..

याबाबतचे आदेश राज्य शासनाने आज काढलेले आहेत सध्या के मंजू लक्ष्मी या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून उद्या कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक म्हणून त्या पदभार स्वीकारतील.


अखेर कोल्हापूरला मिळाल्या आयुक्त