बातम्या

कोतोलीमध्ये जागृत ग्रामस्थ पतसंस्थेचा आज शुभारंभ 

kotoli patsanstha inogratation


By Administrator - 1/21/2024 6:53:21 PM
Share This News:



कोतोलीमध्ये जागृत ग्रामस्थ  पतसंस्थेचा आज शुभारंभ 


कोतोली (पांडुरंग फिरिंगे ) पन्हाळा तालुक्यातील कोतीली येथे आज जागृत ग्रामस्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा एस टी स्टॅन्ड कोतोली येथे आयोजित केला आहे . आज  २२ जानेवारी रोजी भारतभर रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोस्तव साजरा केला जात  आहे या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून जागृत ग्रामस्थ पतसंस्थेचा शुभारंभ आयोजित केला आहे 
 

सहकारातून सबलीकरण करणे हे धोरण ठेवून संचालक मंडळ यांनी महिला सबलीकरण ,नागरिकांना बचतीची सवय लावणे तसेच तरुणांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देणेस साहाय्य करणे ,आर्थिक दुर्बल घटकांना सहाय्य करणे ,तसेच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनवणे ,शेतीसाठी साहाय्य करणे ,शेतकऱ्यांना आर्थिक ,बचतीची सवय लावणे ,शेतीबरोबर पूरक व्यवसायास चालना देणे अशा बहुउद्देशाने या  पतसंस्थेची स्थापना केली आहे 


अशा या सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा सोमवारी  दुपारी १२.२९ मिनिटांनी कायदेतज्ञ  माननीय शाहू काटकर कोल्हापूर जिल्हा मजूर संस्था फेडरेशनचे संचालक ,पोर्लेतर्फ बोरगाव गावचे माजी सरपंच यांचा शुभहस्ते होणार आहे 


 या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मोरारजी  सातपुते, .कृष्णात लव्हटे, केरबा पाटील,. विलास गायकवाड, आनंदा  पाटील ,निवृत्ती पाटील, विलास सुतार,.तुकाराम पाटील, धनाजी दळवी, भिवाजी चौगले, तानाजी सावंत,.जी. एस. कांबळे,संदीप गुरव, .सागर  वरपे,अमित विचारे या मान्यवरांची असणार आहे 


या पतसंस्थेस तज्ञ संचालक मंडळ  .हरिश्चंद्र  खाडे.,आनंदराव पाटील,. सचिन पाटील,सौ. सुनिता सुतार लाभले आहेत  ,तर संचालक मंडळामधें .आकाश पाटील,दौलत सातपुते,दामोदर कराळे,.पांडुरंग पाटील,.गणपती चौगुले, .पांडुरंग कुंभार, .दिपक पाटील, सौ.सुनिता पाटील सहदेव सुतार,.नितीन सुतार,भरत पाटील,यांचे मोलाचे सहकार्य आहे 


तरी या संस्थेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणेचे आवाहन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण चौगुले,व्हा. चेअरमन विजय फिरींगे,मॅनेजरअमित विचारे यांनी केले आहे 

उद्घाटन कार्यक्रमवेळी ठेवी स्विकारल्या जातील यासाठी संस्थेचे कर्मचारी वर्ग सौ.दिपाली चौगुले ,.दत्तात्रय लव्हटे,.शशिकांत शेटे (क्लार्क).कृष्णात पाटील (शिपाई) याचे सहकार्य राहील 


कोतोलीमध्ये जागृत ग्रामस्थ  पतसंस्थेचा आज शुभारंभ