बातम्या
"शिवनेरी" तून जनसेवेचे व्रत अखंडितपणे जोपासू ;राजेश क्षीरसागर
By nisha patil - 8/19/2023 5:09:04 PM
Share This News:
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला आहे. शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर सन २००७ मध्ये कसबा बावडा वासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी "शिवनेरी" या शिवसेनेचे विभागीय संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले. आजतागायत या कार्यालयातून नागरिकांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जात आहे. आगामी काळातही शिवनेरी विभागीय कार्यालयातून जनसेवेचे व्रत अखंडितपणे जोपासू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. शिवनेरी या कसबा बावडा शिवसेना विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचा उद्घाटन सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी "जय भवानी जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो" अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, रोहन उलपे, धवल मोहिते, सुरज सुतार, आदर्श जाधव, कृष्णा लोंढे, कपिल पोवार, सचिन पाटील, राकेश चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी, कसबा बावडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"शिवनेरी" तून जनसेवेचे व्रत अखंडितपणे जोपासू ;राजेश क्षीरसागर
|