बातम्या

युवा दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्र्यांचे पत्र संदेशाचे प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे सामुदायिक वाचन

letter on Youth Day at Private High School Kolhapur


By nisha patil - 12/1/2024 7:58:59 PM
Share This News:



युवा दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्र्यांचे पत्र संदेशाचे प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे सामुदायिक वाचन
 

माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांचे पत्र

 

आज शासकीय उपक्रम युथ दिनानिमित्त कोल्हापुरातील प्राईव्हेट हायस्कूल येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत  विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी दिलेल्या संदेश पत्रकाचे वाचन करण्यात आले.
 

सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आलेल्या एका विशेष पत्राची मोठी चर्चा आहे. ते पत्र पाठविलेय थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक शाळा सुंदर व्हावी यासाठी ४५ दिवसांचे विशेष अभियान राबविले जात आहे. याच अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहन करणारे हे पत्र आहे.
 

राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा... सुंदर शाळा’ हे अभियान १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत यात शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. हेच अभियान विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी करावे, याचे मार्गदर्शन-आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठविले आहे. असच पत्र  कोल्हापुरातील प्राईव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात आल.आज शासकीय उपक्रम युथ दिनानिमित्त प्राईव्हेट हायस्कूमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्राच वाचन करण्यात आलं.
   

शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत आदर व उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात यशस्वी होणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील प्रथम पारितोषिके तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिके दोन लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला एक लाख रुपये असून जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिके ११ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये आहे. तसेच विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिके २१ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके ११ लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला सात लाख रुपये आहे. राज्यस्तरावर ५१ लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिके व द्वितीय आलेल्या शाळांना २१ लाख रुपये तर तृतीय ११ लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.


युवा दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्र्यांचे पत्र संदेशाचे प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे सामुदायिक वाचन